368483-368465-00000003551.jpg 
विदर्भ

जिल्ह्यात नऊ पॉझिटिव्ह !

सकाळ वृत्तसेवा

अकोलाः जिल्ह्यात गुरुवारी (ता.9) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या नऊ जाऊन पोहचली आहे. पातूर येथील सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता ही संख्या नऊ वर पोहोचली आहे.

गुरुवारी दिवसभरात (गेल्या 24 तासांत) 10 जण संशयित रुग्ण म्हणून दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत 157 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 114 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 105 निगेटिव्ह आहेत. तर नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून 281 जणांची नोंद झाली आहे. त्यातील 98 जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. (81 जण गृह अलगीकरणात तर 17 जण संस्थागत अलगीकरणात) तर 134 जणांचा गृह अलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर 48 जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

अकोट फैलात रुग्णांची नुसती दिल्लीची ट्रॅव्हल्स हिस्ट्री
अकोला शहरात आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांची केवळ दिल्लीची ट्रॅव्हल्स हिस्ट्री आहे. या रुग्णांचा मरकजशी कुठल्याच प्रकारचा संबंध नसल्याची माहिती त्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. तेव्हा या रुग्णांबाबत कुठलाही संभ्रम ठेऊ असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

अशी आहे आजची स्थिती
तपासणीसाठी पाठविलेले नमुने-157
प्राप्त अहवाल- 114
पॉझीटिव्ह-9
निगेटिव्ह- 105
प्रलंबित-43

नऊही रुग्णांची प्रकृती स्थिर
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या पॉझिटीव्ह रुगणांची संख्या नऊवर जाऊन पोहचली आहे. या सर्व रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, सर्वच रुग्ण उपचार करताना सहकार्य करीत असून, सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नव्याने दहा संशयित दाखल
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभरात (गेल्या 24 तासांत) नव्याने 10 जण संशयित रुग्ण म्हणून दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचे वैद्यकीय अहवाल लवकरच प्राप्त होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT